importance of traffic rules : चंद्रपुरात 3 दिवसात 804 नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

importance of traffic rules

importance of traffic rules : चंद्रपूर – नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात एकीकडे तरुणाई सज्ज झाली होती तर दुसरीकडे काही अप्रिय घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलीस आपले कर्तव्य बजावीत होते.

चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या (chandrapur traffic police) वतीने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात नाकेबंदी करीत मद्य प्राशन करून वाहन चालविणे, बुलेट सायलेन्सर मध्ये बदल व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यावर कारवाई मोहीम राबवली.

चंद्रपुरात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, यु टर्न जीवावर बेतला

नव वर्षाच्या स्वागत दरम्यान स्टंटबाजी, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उभारत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 406 चालक, ट्रिपल सीट वाहन चालविणारे 374, बुलेट दुचाकी वाहनाच्या सायलेन्सर मध्ये बदल करणाऱ्या 24 चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेच्या या कारवाईत एकूण 40 हजार दंड वसूल करण्यात आला.

नव्या वर्षात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई मोहीम सुरू राहणार अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली. 3 दिवसात एकूण 804 नागरिकांवर कारवाई करण्यात आली हे विशेष.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!