chandrapur crime news
chandrapur crime news : चंद्रपूर – नागपूर रोडवरील वडगाव परिसरातील तीन दुकाने शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडली. २ लाख १५ हजाराची रोख रक्कम चोरली.
चंद्रपुरात गांजा विक्री, 1 किलो गांजा जप्त
वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसुत इंटरप्राईजेस, चांडक मेडिकल आणि जनार्धन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. पवनसुत इंटरप्राईजेसचे मालक अतुल कुचनकार यांनी पोलिसात तक्रार दिली.
शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पवनसुत इंटरप्राईजेसच्या मागील बाजूचे शटर फोडले. दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेली १ लाख ७० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले.त्याच रात्रीच याच परिसरातील रोहित सुधाकर माडुलवार यांच्या जनार्धन एजन्सीमध्येही चोरट्यांनी हात साफ केला.
अस्वल चक्क पोलीस चौकी समोर आली आणि….
यामध्ये ४५ हजार रुपये चोरून नेले. बापटनगर चौकामध्ये असलेल्या चांडक मेडिकलचेही शटर तोडून ३५ हजार रुपये लंपास केले. अतुल कुचनकार, मोहित चांडक, रोहित माडुरवार यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.