Ganja City | चंद्रपुरात गांजाविक्री ला वेगळे स्वरूप, पानठेल्यात मिळतोयं गांजा

Ganja City

Ganja City : 3 जानेवारीला रात्री चंद्रपूर शहरात अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला कट लागल्याने चार अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलाची हत्या केली, त्यावेळी मारेकरी हे नशेत होते.

या घटनेनंतर चंद्रपूर पोलीस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई मोहीम राबवित आहे. (Ganja effects)
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पान ठेल्याच्या आडून गांजाविक्री करणाऱ्यांवर रामनगर पोलिसांनी छापामार कारवाई केली. या कारवाईत 1.087 किलोग्रॅम गांजा किंमत 5 हजार 100 रुपये जप्त करण्यात आला.

चंद्रपुरात डिलिव्हरी बॉय समोर आली अस्वल

वन अकॅडमी समोर पान ठेला चालक नितीन सोमलाल भलावी रा. सिवनी मध्यप्रदेश हल्ली मुक्काम इंदिरानगर मूल रोड चंद्रपूर हा खर्रा व सिगारेट च्या आड युवकांना गांजा विकतो अशी माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती.

रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचत पान ठेल्यावर छापा मारला असता लहान, मोठ्या पुड्यामध्ये गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवला होता.
आरोपी नितीन भलावी हा गांजा कुठून आणतो याबाबत पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
आरोपीवर कलम 8(क), 20(ब), ii(ब), 29 एनडीपीएस ऍक्ट अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहायक पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे, सहायक पोलिस निरीक्षक हिमांशू उगले, पोलीस कर्मचारी आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनीषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

गांजा हब

चंद्रपूर शहरात गांजा सहित मॅफेड्रोन म्हणजेच एमडी हे अंमली पदार्थ सर्रास विक्री होते, शहरातील बाबूपेठ भागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री होते. अंमली पदार्थ सहित तळीरामांना निसर्गरम्य वातावरणात मद्य पिण्याचा आनंद घेता यावा यासाठी बाबूपेठ भागातील जुनोना चौक पलीकडे बार सुरू आहे, मात्र या बार ला कसलीही परवानगी नाही. अवैधरित्या हे बार सुरू आहे. याच ठिकाणी काही अंतरावर सुगंधित तंबाखूचा व्यापार चालतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!