Powerful MP | चंद्रपूर जिल्ह्यातील खासदाराचे दमदार काम

Powerful MP

Powerful MP : बामणी हे बल्लारपूर तालुक्यातील महत्वाचे गाव असून जवळपास 10 हजार लोकवस्ती त्या ठिकाणी आहे. खासदार धानोरकर यांच्या बामणी दौऱ्या दरम्याने तेथील नागरीकांनी अनेक समस्या खासदारांसमोर माडल्या.

चंद्रपुरातील विविध गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर

त्यातील जलद, अतीजलद, इलेक्ट्रिक 9 मी. व 12 मी., तसेच शिवाई, शिवशाही व शिवनेरी या बसेस चा थांबा बामणी येथे मिळावा याकरीता नागरीकांनी मागणी केली होती. त्या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागणीची दखल घेऊन बामणीकर यांची ही समस्या कायमस्वरूपी सोडवीली.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दौऱ्या दरम्यान बामणी ग्रामपंचायतीला भेट दिली असता. तेथील नागरीकांनी बामणी येथे जलद, अतिजलद, शिवाई, शिवशाही व शिवनेरी या बसेस बामणी येथे थांबत नसल्याने प्रवास्यांची गैरसोय होत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांना सांगितले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या समस्येची तात्काळ दखल घेऊन सदर समस्या सोडविण्यासाठी विभागीय नियंत्रक राज्यपरिवहन मंडळ, चंद्रपूर यांना आदेशीत केले. त्यासंदर्भाने दि. 15 जानेवारी 2025 रोजी विभागीय नियंत्रक, चंद्रपूर यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन बामणी येथे सर्व बसेस ला थांबा देण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार पत्र मिळताच आगार प्रमुखांनी चालक व वाहकाला सुचना द्याव्यात, असे देखील पत्रात नमुद केले आहे. सदर समस्येचे तात्काळ समाधान झाल्याने नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!