tiger death news
tiger death news : सिंदेवाही – नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिट वनरक्षक सकाळी गस्त करीत असताना मौजा लाडबोरी शेतशिवारातील रमेश पांडुरंग गंडाईत राहणार सिंदेवाही यांच्या शेतातील नाल्याजवळ वाघ मृतावस्थेत आढळून आला.
शेतात जिवंत विद्युत तारेच्या प्रवाहाने धक्का लागून एकाचा मृत्यू
वनरक्षकाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली, माहिती मिळताच घटनास्थळी उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहायक वनसंरक्षक चोपडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे दाखल झाले.
यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे निरीक्षण करण्यात आले, सदर मृत वाघ हा नर असून तो वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून आले. वाघाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता. मृत वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत होते. Chandrapur tiger death
घटनास्थळी वाघाच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करीत उत्तरीय तपासणीकरिता विसेरा घेण्यात आला, पंचासमक्ष घटनास्थळी वाघाचे दहन करण्यात आले. वनविभागाने या प्रकरणी वनगुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे.
सदर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत शवविच्छेदनाचा विस्तृत अहवाल आल्यावर त्याचे निदान करण्यात येईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.