Chandrapur encroachment
Chandrapur encroachment : चंद्रपूर महानगरपालिका तर्फे आज शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच गोल बाजारात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र मोठ्या दुकानदारांना सोडून लहान दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याने एकाने थेट अतिक्रमण हटाव पथकाच्या वाहनाखाली येत गांधीगिरी आंदोलन सुरू केले, माझे साहित्य मला परत करा अशी मागणी त्या दुकानदाराने केली. मनपाने यावेळी पोलिसांना पाचारण केले होते.
सिडीसीसी बँकेची नोकरभरती रद्द होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कारवाईचे संकेत
अत्यंत वर्दळ व गर्दीचे ठिकाण असलेले गोल बाजारात यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली मात्र काही काळ लोटल्यावर परिस्थिती जैसे थे झाली.
29 जानेवारी रोजी चंद्रपूर मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान दुकानदार यांच्यावर आधी कारवाई करण्यात आली, मात्र एका लहान व्यापाऱ्याने आमच्यावरचं कारवाई का करता? ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांच्यावर कारवाई का करीत नाही म्हणून संताप व्यक्त करीत माझे साहित्य मला परत करा असे म्हणत तो व्यापारी अतिक्रमण हटाव पथकाच्या चारचाकी वाहनाखाली येत गांधीगिरी आंदोलन करू लागला.
गोल बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, सर्व अतिक्रमण हटले पाहिजे, मात्र कारवाई ही अतिक्रमणाचे नियम न पाळण्यावर झाली पाहिजे, वारंवार लहान व्यापाऱ्यांवर कारवाई केल्या जाते.
मनपा पथकाने यावेळी पोलिसांना पाचारण केले, 4 ते 5 तास सदर आंदोलन चाललं.
यावेळी काही काळ गोल बाजार परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली होती.