chandrapur latest news
chandrapur latest news : एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्याचे संकेत वाहतूक विभागाने केले आहे तर दुसरीकडे अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला कट लागल्याने त्यांनी 19 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना 3 जानेवारी ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. 19 वर्षीय तन्मय जावेद खान रा. बाबूपेठ असे मृत मुलाचे नाव आहे.
कृषी पंप वीज जोडणी वरून खासदार धानोरकर आक्रमक
3 जानेवारी ला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तन्मय हा घरी येत होता वाटेत त्याच्या दुचाकीने काही अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला धक्का लागला, त्यामुळे आमच्या वाहनाला कट का मारली, आमच्या वाहनाचे नुकसान झाले म्हणून चार अल्पवयीन मुलांनी तन्मय ला मारहाण करणे सुरू केले.
दुचाकीचे नुकसान केले म्हणून चौघांनी तन्मय ला पैसे मागितले मात्र तन्मय जवळ पैसे नव्हते, त्याने आपल्या मित्राला फोन करून मला काही मुलांनी पकडून ठेवले आहे, ते 5 हजार मागत आहे अशी माहिती दिली, मित्राने तन्मय चा भाऊ राहील ला याबाबत सांगितले असता त्याने तात्काळ शहर पोलीस स्टेशनमध्ये वाहनांच्या किरकोळ वादात तन्मय ला मारहाण करीत काही मुले महाकाली मंदिर गौतम नगर कडे गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ महाकाली मंदिर जवळ शोधमोहीम राबवली, तन्मय च्या मोबाइल ची लोकेशन घेतली असता गौतम नगर जवळील रेल्वे पटरी जवळ त्याचे लोकेशन मिळाले.
पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, तन्मय चे दुचाकी वाहन व काही अंतरावर मोबाईल व तन्मय चा मृतदेह पोलिसांना आढळला.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करित मारेकरी चार विधिसंघर्ष मुलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी याबाबत विचारपूस केली असता मारेकरी मुलांनी सांगितले की तन्मय च्या वाहनांने आमच्या दुचाकीला कट मारली त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले, आम्ही त्याला पैसे मागितले, त्याने असमर्थता दाखवल्यावर आमच्या हातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. (Chandrapur city)
चारही विधिसंघर्ष मुलांनी तन्मय ला लाथा बुक्क्याने मारहाण करीत त्याची दगडाने ठेचत हत्या केली.
विशेष म्हणजे हे कृत्य करताना विधिसंघर्ष मुले नशेत होती, नशा उतरल्यावर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
चार मारेकरी पैकी एक पोलिसांचा मुलगा आहे, त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. (Chandrapur latest news)
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 वर्षांपासून अंमली पदार्थाची तस्करी सुरू आहे, एमडी, गांजा असे अनेक अंमली पदार्थ शहरातील विविध भागात सहज उपलब्ध होतात, हा नशा करण्यासाठी मुले कसल्याही मार्गाने पैसे गोळा करतात, पैसे गोळा करण्यात काही अडचण आली तर गुन्हेगारीचा मार्ग पत्करतात. या गुन्ह्यामागे ही पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.