Chandrapur Municipal Corporation corruption | चंद्रपूर मनपाच्या भ्रष्ट कारभाराची ईडी कडे तक्रार

Chandrapur Municipal Corporation corruption

Chandrapur Municipal Corporation corruption : चंद्रपूर महानगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहारांवर तीव्र प्रकाश टाकत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवर्तन संचालनालय (ईडी) मुख्यालय, दिल्ली येथे तक्रार अर्ज सादर करण्यात आला.

खड्ड्यात बसून चंद्रपुरात सत्याग्रह आंदोलन

या तक्रारीत महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळात 1,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रमुख आरोप:

  • अमृतपाणी योजना फेस 1: टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता व अपूर्ण कामांसाठी पूर्ण पेमेंट.
  • अमृत कलश योजना 2: अपूर्ण कामे असूनही निधीचा दुरुपयोग.
  • कचरा संकलन व दलित वस्ती सुधारित योजना: फसव्या निविदा प्रक्रियेमुळे सरकारी निधीची हानी.
  • फाउंटन घोटाळा : निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता.
  • शहर सौंदर्यीकरणासाठी काढण्यात आलेल्या छोट्या निविदा: निधीचा अपव्यय.
  • ड्रेनेज सिवर घोटाळा

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रत्येक मोठ्या योजनेत भ्रष्टाचाराचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. टेंडर प्रक्रिया पारदर्शकतेने न होणे, अपूर्ण कामांसाठी संपूर्ण निधी देणे आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय करणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख गैरव्यवहार आहेत. हा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या विश्वासाला फसवणूक आहे.” (Chandrapur Municipal Commissioner scam)

ईडीकडून मिळाले आश्वासन:
तक्रारीच्या सादरीकरणानंतर ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर तातडीने लक्ष घालून चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले.

प्रमुख मागण्या:

  1. चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.
  2. महानगरपालिकेच्या सर्व योजनांचे लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे.
  3. दोषी अधिकारी विपिन पालीवाल आणि इतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

तक्रार सादर करताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, आदित्य नंदनवार, आणि रोहन गुर्जेवार उपस्थित होते. परंतु, नेतृत्वाच्या आघाडीवर मयूर राईकवार यांनी अत्यंत प्रभावीपणे या मुद्द्याला वाचा फोडली.

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, “चंद्रपूरच्या जनतेच्या पैशांची ही लूट थांबवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. हा केवळ एक राजकीय लढा नाही, तर चंद्रपूरच्या सामान्य जनतेच्या हक्कांचा लढा आहे.”

आम आदमी पक्षाच्या वतीने हा लढा पुढेही सुरू राहील आणि चंद्रपूरच्या जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब मागितला जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!