Chandrapur Road | महत्वाची सूचना – चंद्रपुरातील हा मुख्य मार्ग राहणार बंद

Chandrapur Road

Chandrapur Road : माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम 10 जानेवारीला चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित केला गेला असून कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांची उपस्थिती राहणार आहे.

दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी

याकरिता कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशावर प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका चौकमार्गावरील सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे सोबतच सदर मार्गावर नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणून सदर कालावधीसाठी घोषित करण्यात येत आहे.

या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना रहदारीसाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने पर्यायी मार्ग सुचवला आहे.

कार्यक्रम कालावधीत नागरिकांनी नागपूर कडून चंद्रपूर शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उड्डाणपूल, सिद्धार्थ हॉटेल, बस स्टॅण्ड, प्रियदर्शिनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक, संत कंवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश दिला जाणार.


चंद्रपूर शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, बस स्टॅण्ड चौक, सिद्धार्थ हॉटेल, उड्डाणपूल वरोरा नाका मार्गे किंवा संत कंवलराम चौक, मित्र नगर चौक मार्गे शहराबाहेर जातील.
नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक व वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!