Chandrapur Satyagraha
Chandrapur Satyagraha : 30 जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपा प्रशासनविरोधात अनोखं सत्याग्रह आंदोलन पुकारले.
मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गांधीगिरी, दुकानदार आला वाहनाखाली
सध्या शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्ते मनपा ने खोदून काढले आहे, आधीच प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपुरातील नागरिक मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यामध्ये अमृत च्या कामाने सर्वत्र धूळ पसरली आहे. (Chandrapur Road Digging Issues)
मनपाच्या या कामविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सत्याग्रह आंदोलन करीत मनपा द्वारे खोदलेल्या खड्ड्यात महात्मा गांधी यांची प्रतिमा घेत सत्याग्रह (Chandrapur Satyagraha Protest) आंदोलन सुरू केले.
सिडीसीसी बँकेच्या पदभरती बाबत मोठी अपडेट, पदभरती रद्द होणार?
देशमुख यावेळी म्हणाले की 16 वर्षांपूर्वी प्रशासनाने 100 कोटी रुपये खर्च करीत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले होते, कंत्राटदाराला पैसे मिळाले मात्र योजना पूर्णतः फसली, आज 16 वर्षांनी पुन्हा 500 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे, सोबतच अमृत योजनेचे 234 कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून या कामामुळे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास होत आहे.
मनपाने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम दिले असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करीत मनपाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी असे लिखित आश्वासन प्रशासनाने आम्हाला 48 तासाच्या आत द्यावे अन्यथा आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला.