Charity show । बल्लारपूरमध्ये आर्थिक दुर्बल कलाकारांसाठी ‘आमिर सलमान शाहरुख’ चित्रपटाचे प्रदर्शन

Charity show

Charity show : चित्रपट क्षेत्रात कार्य करणारे ज्युनियर कलाकार व अंध, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम कलाकारांच्या मदतीसाठी बॉलीवूड मधील तीन खान एकत्र आले आहे. अंध, अपंग कलाकार यांच्यासाठी बल्लारपूर शहरातील गोंडवाना नाट्यगृहात १६ ते २२ जानेवारी या कालावधीत शाहरुख, आमिर व सलमान या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. अशी माहिती १ ४ जानेवारीला बल्लारपुरातील निवासी गणेश राहिकवार (ज्युनियर शाहरुख खान) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.

Ongc मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगार १ लाख ८० हजार

दिग्दर्शक इकबाल सुलेमान यांच्याद्वारे निर्मित आमिर सलमान शाहरुख हा चित्रपट बल्लारपुरातील गोंडवाना नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे रोज ३ शो आयोजित केले असून फक्त ९ ९ रुपयात नागरिक हा चित्रपट बघू शकतात.

चित्रपट बल्लारपूर येथे प्रदर्शित करण्याचे कारण स्पष्ट करताना गणेश राहिकवार म्हणाले कि चित्रपट क्षेत्रातील अंध, अपंग व आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेले कलाकार ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनातून जमा झालेली रक्कम त्यांच्या मदतीकरिता देण्यात येणार आहे.

१६ ते २२ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते रात्री ९ वाजता नियमित ३ शो प्रदर्शित होणार आहे नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश राहिकवार यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ज्युनिअर सलमान खान उपस्थित होते.

शोची वेळ आणि तिकीट दर

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!
लसूणचे फायदे