Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला जनतेने बहुमताचा स्पष्ट कौल दिला, भाजप पक्ष या निवडणुकीत मोठा भाऊ ठरल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
त्यांनतर मंत्रिमंडळ विस्तराचा मुहूर्त पार पडला, भाजपने ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा विजय प्राप्त करणारे सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट केला, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते नाराज झाले.
माता महाकाली मंदिर परिसराचा विकास पूर्णत्वास नेणार – मुख्यमंत्री फडणवीस
राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यावर पहिल्यांदा चंद्रपुरात त्यांचे आगमन झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांनी मुनगंटीवार नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर फडणवीस म्हणाले कि त्यांनी मला याबाबत संपर्क केला होता. त्यांची या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती मात्र त्यांचं वयक्तिक काम आल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.
तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी मुंबई येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, यावेळी प्रसार माध्यमांनी चंद्रपुरातील कार्यक्रमाला आपण अनुपस्थित का आहे? असा प्रश्न विचारला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले कि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार जोरगेवार यांनी मला फोन केला होता मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे फोन काही उचलला गेला नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री पदावर असताना त्यांनी अनेक विकासात्मक कार्ये केली होती, मेडिकल कॉलेज, बॉटनिकल गार्डन यासह मोठे प्रकल्प जिल्ह्यात सुरु झाले. मात्र मंत्रिमंडळ विस्तार वेळी माशी कुठं शिंकली हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.