Property tax exemption | चंद्रपूर मनपातर्फे मालमत्ता धारकांना सवलत जाहीर

Property tax exemption

Property tax exemption : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत असुन २ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकास ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास ५० टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास ४५ टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.

अंमली पदार्थ विरोधात आमदार जोरगेवार यांनी ठोकला शड्डू


   त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत थकबाकीसह पूर्णत कराचा भरणा करण्याऱ्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास २५ टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास २२ टक्के शास्तीत सूट देण्यात येणार आहे. तसेच सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये माहे डिसेंबर २०२४ पर्यंत ज्या मालमत्ता धारकांनी शास्तीचा भरणा केलेला आहे त्यांचे ५० टक्के शास्तीची रक्कम पुढील आर्थिक वर्षात समायोजित करण्यात येणार आहे. (Cmc chandrapur)


   महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.


    चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.


    मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!