Coal dust in residential areas
Coal dust in residential areas : चंद्रपुरातील औष्णिक वीज केंद्रातील कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून रोप व्हे द्वारे वीज केंद्रात कोळश्याची वाहतूक केल्या जाते मात्र यामुळे दुर्गापुरातील कोंडी नेरी गावात नागरिकांना कोळशाच्या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी
सोबतच रोप वे कार्यालयातील CHP मधून यंत्रांच्या मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषणात सुद्धा वाढ होताना दिसत आहे.
कोंडी नेरी गावातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
नागरिकांनी याबाबत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सदर समस्येपासून मुक्तता मिळावी याबाबत निवेदन दिले. आज सुधीर मुनगंटीवार थेट पाहणी करण्यासाठी रोप व्हे कार्यालयात दाखल झाले.
अधिकाऱ्यांना धूळ व ध्वनी प्रदूषणावर लवकरात लवकर उपाययोजना करा असे निर्देश दिले.
प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की आज कोंडी नेरी गावातील नागरिक प्रदूषणाने त्रस्त झाले आहे, रोप व्हे द्वारे जाणाऱ्या कोळश्याने धुळीचे कण मोठ्या प्रमाणात उडत असल्याने याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे, सोबतच रोप व्हे कार्यालयातील यंत्राच्या आवाजाने या प्रदूषणात भर टाकली आहे.
नागरिकांनी आवाज उचलला तर यंत्र बंद होतात मात्र ते तात्पुरते असतात, यावर आता कायमस्वरूपी उपाययोजना हवी अन्यथा नागरिकांचा उद्रेक होणार, एकीकडे सुप्रीम कोर्ट ध्वनी प्रदूषणावर कठोर आहे, उत्सवात डीजे च्या आवाजाला निर्बंध घालण्यात येते आणि इथे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या जाते हे आता चालणार नाही.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.