Complaint against cdcc bank | CDCC बँकेविरोधात आप ची ED कडे तक्रार

Complaint against cdcc bank

Complaint against cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 360 पदांच्या अवैध भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, या संदर्भात आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजीव कूडे, युवा सचिव आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी नवी दिल्ली येथील प्रवर्तन निदेशालयाच्या (ED) मुख्यालयात भेट घेतली.

या भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (SC, ST, OBC) आरक्षण काढून टाकण्यात आले असून, 31,000 पेक्षा जास्त उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत 25 ते 40 लाख रुपयांची लाच देऊन उमेदवारांची निवड केल्याचे गंभीर आरोप आहेत.

चंद्रपूर पोलीस दलाचा तक्रार निवारण दिन

यासंदर्भात आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रवर्तन निदेशालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. त्यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी म्हटले की, “ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक असून, चंद्रपूरच्या सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा डाव आहे. आम्ही ही भरती प्रक्रिया ची चोकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवू.”

आम आदमी पक्षाने हा प्रश्न सार्वजनिक पातळीवर नेण्याचा निर्धार केला आहे आणि या भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!