congress on election commission | निवडणूक आयोगविरोधात कांग्रेसचा एल्गार

congress on election commission

congress on election commission : वर्ष २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या ६  महिन्यांनी राज्यात ५० लाख नवीन मतदार वाढले, विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी रात्री ७६ लाख मतदार वाढले, याबाबत निवडणूक आयोग पुरावे देत नाही.

राज्यात आलेले सरकार हे जनमताचे नाही अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग भाजप पक्षाच्या बाजूने असल्याचा आरोप प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेस पक्ष आंदोलन करणार असा इशारा पटोले यांनी दिला. २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी चंद्रपूरात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा, कुटुंबाची पत्रकार परिषद

निवडणूक आयोगाविरोधात कांग्रेसने कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग विरोधी पक्षाचे काही ऐकायला तयार नव्हते, अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत घोळ बघायला मिळाला. मतदानाच्या आकड्यात रात्री अचानक वाढ झाली याबाबत आयोग गप्प आहे.

सत्तारूढ पक्ष व आयोगाची हातमिळवणी झाली आहे सोबतच ईव्हीएम चा घोळ विधानसभा निवडणुकीत करण्यात आला असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला.

सामान्य जनतेचे प्रश्न व लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.

आंदोलनात माजी आमदार कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, महिला अध्यक्ष चंदा वैरागडे, विनोद दत्तात्रय, विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, सुनीता लोढिया, केके सिंग आदी उपस्थित होते. 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!