iPhone 16 |आयफोन झाला १६ हजार रुपये स्वस्त, कुठं मिळतेय हि ऑफर

iPhone 16

iPhone 16 : Apple हा एक प्रतिष्ठित टेक ब्रँड आहे जो वर्षातून फक्त एकदाच नवीन मोबाइल लॉन्च करतो, पण त्याच्या iPhones चे क्रेझ वर्षभर टिकून राहते. 2024 मध्ये कंपनीने आयफोन 16 लॉन्च केला होता, जो पॉवरफुल प्रोसेसर, प्रगत फीचर्स आणि AI तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला. लॉन्चवेळी या आयफोन ची किंमत ₹79,900 होती, परंतु आता आयफोन 16 फक्त ₹63,999 मध्ये खरेदी करता येईल. आयफोन 16 वर तब्बल ₹15,901 पर्यंत सूट मिळणार आहे.

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?


सविस्तर माहिती म्हणजे, आयफोन 16 सवलतीच्या दरात Flipkart वर उपलब्ध होणार आहे. Flipkart वर “Monumental Sale” या सेलचा आयोजन करण्यात आला आहे ज्यामध्ये नवीनतम Apple आयफोन कमी दरात विकला जाईल. ही Monumental Sale 13 जानेवारीपासून सुरू होईल. विशेष म्हणजे Republic Day सेलच्या आधीच ग्राहकांना स्वस्त दरात मोबाइल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे

सर्वप्रथम सांगायचे झाले तर आयफोन16 भारतात 79,900 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. ही किंमत 128GB स्टोरेज मॉडेलसाठी होती.
सेल दरम्यान iPhone 16 फक्त ₹63,999 मध्ये खरेदी करता येणार आहे.
लॉन्च प्राइसच्या तुलनेत iPhone 16 ₹15,901 कमी दरात उपलब्ध होणार आहे.
Flipkart च्या सेलमध्ये आयफोन 16 वर डिस्काउंटसह आकर्षक बँक ऑफर्स देखील मिळतील.
HDFC बँकेच्या ग्राहकांना iPhone 16 खरेदीवर 10% सवलत मिळेल. ही सवलत क्रेडिट कार्ड पेमेंट आणि Easy EMI वर लागू होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीनतम आयफोन वर लॉन्चनंतर फक्त 4 महिन्यांतच इतका मोठा ऑफर मिळणे खरोखरच चकित करणारे आहे.

आयफोन 16 चे फीचर्स

डिस्प्ले:
आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाची Dynamic Island सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे, जी OLED पॅनलवर आधारित आहे. या डिस्प्लेवर 2000nits ब्राइटनेस, HDR10, आणि Dolby Vision यांसारखे प्रगत फीचर्स दिले आहेत. फोनच्या स्क्रीनला Ceramic Shield Glass द्वारे संरक्षित केले गेले आहे.

परफॉर्मन्स:
iPhone 16 मध्ये नवीनतम iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम आहे. प्रोसेसिंगसाठी यात Apple A18 Bionic चिपसेट वापरले गेले आहे. हा 6-कोर CPU आहे ज्यामध्ये 3.89GHz क्लॉक स्पीडचे 2 परफॉर्मन्स कोर आणि 2.2GHz क्लॉक स्पीडचे 4 एफिशियन्सी कोर आहेत. iPhone 16 चा CPU iPhone 15 च्या तुलनेत 40% जलद आणि 35% अधिक कार्यक्षम आहे.

कॅमेरा:
iPhone 16 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

  • मुख्य कॅमेरा: 48MP फ्यूजन सेन्सर, 26mm, f/1.6 अपर्चरसह.
  • दुसरा कॅमेरा: 12MP टेलीफोटो लेन्स, 120° फील्ड ऑफ व्ह्यू, f/1.6 अपर्चर.
    फ्रंट कॅमेरा: 12MP टेलीफोटो लेन्स, f/1.9 अपर्चरसह.
    iPhone 16 मध्ये नवीन डिझाइनसह एक कॅमेरा कंट्रोल बटण दिले आहे, जे अनेक कामांसाठी उपयुक्त आहे.

बॅटरी:
आयफोन 16 मध्ये 3,500mAh क्षमतेची बॅटरी आहे. ऍपलच्या मते, ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 80 तासांचा ऑडिओ प्लेबॅक देऊ शकते. यात 25W MagSafe वायरलेस चार्जिंग आणि 15W Qi वायरलेस चार्जिंगसुद्धा उपलब्ध आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!