Drugs Addiction
Drugs Addiction : चंद्रपूर शहर आता नशेच्या धुव्यात उडता चंद्रपूर कडे वाटचाल करीत आहे. गांजा नंतर आता जिल्ह्यात एमडी ड्रग्स ची सर्रास विक्री सुरू आहे.
भावी पिढीला अवैध व्यवसायिक नशेच्या आहारी जाण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे, या गंभीर समस्येवर जनप्रतिनिधी व प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
3 जानेवारीला तन्मय खान या मुलाची 4 अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचत हत्या केली, कारण तन्मय च्या दुचाकीने त्या अल्पवयीन मुलांच्या दुचाकी वाहनाला कट मारली, वाहनांचे नुकसान झाले म्हणून तन्मय ला 5 हजार रुपये मागितले पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने अल्पवयीन मुलांनी तन्मय ची हत्या केली. हत्या करताना चारही अल्पवयीन मुले नशेत होते अशी माहिती पुढे आली आहे. D Ed college

चंद्रपुर शहरातील बाबूपेठ हा भाग गर्दुल्ले, बेवडे व नशेडी लोकांसाठी स्वर्ग बनला आहे, येथील डीएड कॉलेज मधील प्राध्यापकांच्या क्वार्टर मध्ये व्यसनाधीन अल्पवयीन मुलांचा नशा करण्यासाठी सायंकाळी मेळावा भरतो, 10 ते 15 ओसाड असलेल्या शासकीय क्वार्टर मध्ये गांजा, एमडी व दारूचे सर्रास व्यसन केल्या जाते. Government colony
डीएड कॉलेज मध्ये काही वर्षांपासून प्रशिक्षण घेण्यात तरुण वर्ग निरुत्साही झाल्याने शासकीय अध्यापक विद्यालय आता ओसाड झाले, बोटावर मोजण्याइतके कर्मचारी या प्रशिक्षण केंद्रात उरले आहे.

पूर्वी असंख्य तरुण-तरुणी या विद्यालयात प्रशिक्षण घेत होते, अनेक शिक्षक या विद्यालयात घडले, त्यावेळी प्राध्यापक वर्गाला राहण्यासाठी डी.एड कॉलेजच्यामागे प्रशस्त क्वार्टर ची व्यवस्था करण्यात आली होती.
चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार
आज सर्व क्वार्टर ओसाड पडले, वेळेनुसार अध्यापकांची संख्या कमी झाल्याने केवळ कर्मचारी हे काही क्वार्टर मध्ये राहतात, त्यामुळे प्राध्यापकांची वसाहत पूर्णतः ओसाड पडल्याने व प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने यामध्ये आता दम मारो दम या कामासाठी क्वार्टर चा उपयोग होत आहे. Drugs addiction
बाहेरील अल्पवयीन, तरुण मुले दररोज सायंकाळी आपल्या वाहनाने येत सिगारेट द्वारे गांजा व एमडी चे सेवन करतात, यामुळे या परिसरात राहणारे नागरिक गर्दुल्ले यांच्या कृत्याने कंटाळले आहे.

भविष्यात या व्यसनाने मोठी घटना नाकारता येत नाही म्हणून परिसरातील युवक व नागरिकांनी ओसाड पडलेले क्वार्टर जमीनदोस्त करावे अशी मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाची भीती न बाळगता अल्पवयीन मुले बिनधास्त शासकीय क्वार्टर मध्ये सिगरेट ओढतात त्यामधील तंबाखू बाहेर काढत गांजा भरतात, आणि मग नशेच्या दुनियेत जात कुठलंही भयानक कृत्य करायला तयार होतात.
बाबूपेठ प्रभागात काही अवैध व्यावसायिक गांजाचा व एमडी चा व्यापार करतात, ते सुद्धा पोलीस प्रशासनाला न घाबरता, तत्कालीन पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या कार्यकाळात ओसाड पडलेल्या वसाहत व इमारतीची रोज झाडाझडती घेत होते, त्यामुळे त्याठिकाणी गैरकृत्य होण्याचे कारण नव्हते मात्र नवे पोलीस अधीक्षक आल्याने ती मोहीम थंडावली आणि परिस्थिती जैसे थे झाली.
पोलिसांनी नशेचा व्यापार करणाऱ्यांवर करावी करीत त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांचं नेटवर्क कायमचे बंद करावे अशी मागणी आता होताना दिसत आहे.