electric current
electric current : वरोरा : शहरापासून १२ किलोमीटर असलेल्या सालोरी येथे अति दुर्दैवी घटना घडली. शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जिवंत विद्युत प्रवाहाचा वापर करुन सभोवताल तारांना करंट लावणे हे गुन्हा असून सुद्धा करंट लावल्याने सालोरी येथे अरून शेरकुरे यांच्या शेतात काम करणाऱ्या संजय मारुती शिरपूरकर या व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपुरात 804 नागरिकांवर कारवाई
अरून शेरकुरे यांच्या शेतात काम करण्याकरीता सालगडी म्हणून संजय शिरपूरकर हा व्यक्ती काम करायचा, दि.२९ डिसेंबर ला रात्रो ९ वाजता अरून शेरकुरे यांच्या शेतात संजय हा जागली करीता गेला परंतु तो घरी काही परतला नाही. संजय ची दुसऱ्या दिवशी शोधाशोध त्याच्या परिवाराकडून करण्यात आली परंतू त्याची काही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मृतकाचा भाऊ राजेंद्र शिरपूरकर यांनी शेगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली.
एक यु टर्न बेतला जीवावर, तिघांचा मृत्यू
पोलिसांनी या प्रकरणी शोधाशोध केली असता मारोती नागोसे राहणार सालोरी यांच्या शेतात इलेक्ट्रिक करंट लावून असलेल्या ताराला जवळ संजय हा मृत अवस्थेत मिळुन आला. नागोसे यांनी त्याचे शेतातील पिकाच्या संरक्षणाकरिता शेतात असलेल्या मीटर मधून ताराने जिवंत वीज प्रवाह शेताच्या भोवताल सोडला.
मृतक हा त्या ताराला चिटकून मरण पावला प्राप्त तक्रारीवरून नागोसे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्यामार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शहारे हे करीत असून गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे.