Cotton ginning | कोरपना येथील कापूस जिनिंगला आग

Cotton ginning

cotton ginning : कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळ असलेल्या एमएस कापूस जिनिंगला आज 26 जानेवारीला आग लागली. या आगीत कापसाच्या 150 ते 200 कापूस गाठी जळून खाक झाल्याची माहिती आहे, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

चंद्रपुरात पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न

या जिनिंग मध्ये सीसीआय व प्रायव्हेट कापूस खरेदी सुरू होती कापूस खरेदी केल्यानंतर कापसाच्या गाठी तयार करून पाठविलेल्या जातात सकाळी काम सुरू असताना अचानक कापसाच्या गाठित आग लागली त्यानंतर कामगारांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

त्याच वेळी गडचांदूर नगरपरिषद, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंटच्या 3 अग्निशामक वाहनाच्या मदतीने आग विझविण्यात आली असून यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!