financial crisis
financial crisis : महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती बिघडली असून महाराष्ट्र आर्थिक संकटात सापडला असल्याची चिंता व्यक्त करीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व वित्त मंत्री निर्मला सितारमण यांना पत्र लिहित महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला बळकटी आणण्याकरीता आवाहन पत्राद्वारे केले आहे.
ऑक्टोंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. यावेळी युती सरकार ने अनेक घोषणांचा पाऊस पाडला. परंतु सदर घोषणा अमलात आणण्याकरीता महाराष्ट्र सरकार ने कुठलेही वित्तीय नियोजन न केल्याने अनेक विकासात्मक कामांचे कंत्राटदारांचे देयके, दिव्यांगणांना मिळणारे अनुदार, निराधारा योजनेचे अनुदान, बालसंगोपन योजनेचा निधी तसेच मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याकरीता शासनाने काढलेले परिपत्रक व त्याद्वारे महाविद्यालयाला देण्यात येणारे शुल्क अद्यापही प्रलंबित आहे.
चंद्रपुरात निघाली पर्यावरण रॅली
याकरीता महाराष्ट्र सरकार ला पंतप्रधानाने मदत करावी या करीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देशाचे पंतप्रधान यांना पत्र लिहून महाराष्ट्र सरकार ला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांना देखील दिले आहे. केंद्राने आर्थिक मदत केल्यास महराष्ट्राच्या आर्थिक नियोजनास हातभार लागून सामान्यांचे प्रश्न सुटणार हे मात्र नक्की.










