Grievance Redressal Day
Grievance Redressal Day : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे, त्याचप्रमाणे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक विभागाने 100 दिवसांचा आराखडा तयार करून ठोस कामगिरी करावी याकरिता चंद्रपूर पोलीस दलाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये जनसामान्य नागरिकांच्या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.
तक्रार निवारण दिनाला स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी हजेरी लावत शांतता कमिटी ची बैठक घेतली, बल्लारपूर शहरात शांतता व सुव्यवस्था कश्या पध्दतीने राखल्या जाईल याबाबत मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात वाघाने घेतला तिघांचा बळी
शांतता कमिटी च्या बैठकीनंतर पोलीस पाटलांसोबत पोलीस अधिक्षकांनी संवाद साधला, यावेळी नवीन कायदे, रस्ता सुरक्षा, महिला व बालकांविरुद्ध सुरक्षा तसेच गुन्ह्याबाबत, सायबर जागृती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी पोलीस अधिक्षकांसमोर 8 वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, सर्व तक्रारदाराचे म्हणने ऐकत पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले, तक्रारदारांनी यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे आभार मानले, तक्रारींचे निवारण झाल्याबाबत समाधान व्यक्त करीत स्वतः पोलीस अधिक्षकांनी आमच्या तक्रारी ऐकत त्याचं निराकरण केलं ही एक चांगली बाब असल्याचं तक्रारदारांनी म्हटलं.