Guardian Minister Chandrapur | अशोक उईके चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

Guardian Minister Chandrapur

Guardian Minister Chandrapur : 18 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

यंदा पालकमंत्री यांना सहकार्य करण्यासाठी सह पालकमंत्री सुद्धा नियुक्त करण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांचा पालकमंत्री पदावरून पत्ता कट करण्यात आला असून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील खासदाराचे दमदार काम

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न दिल्याने पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
आज चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदार संघातील आमदार व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.


शिवसेना पक्षातून आपल्या राजकीय पर्वाची सुरुवात करणारे अशोक उईके हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहे.


वर्ष 2024 मध्ये ते भाजप पक्षातून निवडणूक जिंकले.
अशोक उईके यांच्या विजयात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा मोठा वाटा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!