Haldi Kunku
समाजाला योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष दयावे -एकुरके मॅडम पोलिस निरीक्षक
Haldi Kunku : दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवराना आमंत्रित करून अतिशय वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत निमित्य बाबूपेठ महिला बचत गटाचा हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावर्षी सुद्धा लालपेठ 3 नम्बर बगीचा येथे मकर संक्रांत निमित्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक चंद्रपूर च्या प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.इंदू अग्रवाल ,कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम, प्रमुख अतिथी ,डॉ ऋतुजा मुंधडा ,ऍडव्होकेट वैशाली टोंगे,प्रीती घोडेस्वार सखी वन स्टॉप च्या सल्लागार ,जिल्हा प्राधिकरण,बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या आयोजक सौ चंदाताई वैरागडे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. Haldi kunku
चंद्रपुरात अलिखित परवानगीचा सट्टा मटका
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,मा फातिमा शेख, यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. तसेच पाहुण्यांचे स्वागत ज्ञानेश्वरी तडसे ,अश्विनी बल्लावार यांनी स्वागत गीतानी तसेच घुग्गूस येथील महिलांनी स्वागतनृत्याने केले.
याप्रसंगी प्रास्ताविकेतून चंदाताई वैरागडे यांनी बचत गट केवळ पैश्याच्या देवाण घेवाण साठी स्थापन केला नसून महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या मध्ये असलेले कला कौशल्य विकसित करून स्वयंरोजगार निर्मिती साठी प्रोत्साहित करणे.आणि आपल्या संसाराचा गाडा योग्य रीतीने चालविण्यासाठी सक्षम करणे आहे,बचत गटाच्या माध्यमातून अनेकांचे मुलं उच्च शिक्षण घेऊन नोकरीवर लागले ,कुणाचे घराचे,गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले यांचा मनस्वी आनंद माझ्यासह माझ्या बचत गटातील महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे,यापुढेही असेच प्रामाणिक कार्य सुरू राहील असे मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ इंदू अग्रवाल यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि आता कितीही मोठा आजार झाला तरी प्रत्येक आजारावर इलाज असल्यामुळे घाबरन्याची गरज नाही, तात्काळ तज्ञ डॉ.चा सल्ला घ्यावा.
पोलीस निरीक्षक एकुरके मॅडम यांनी आजची नारी हीच समाजाला योग्य दिशा देणारी शक्ती आहे,एकीकडे प्रत्येक क्षेत्रात महिला प्रमुख पदावर कार्य करताना दिसत आहे परंतु दुसरीकडे मात्र महिलांवर अत्याचार होताना दिसत आहे,हा अत्याचार थांबविण्यासाठी महिलांनी घाबरून न जाता निर्भयपणे मुकाबला केला पाहिजे आणि तात्काळ पोलीस यंत्रणेला माहिती दिली पाहिजे,पोलीस यंत्रणा 24 तास समाजाच्या रक्षनासाठी तत्पर असतात.
ऍड .वैशाली टोंगे यांनी कायदेविषयक माहिती देताना कौटोबीक अत्याचार ,लैगिक अत्याचार ,हुंडाबळी अश्या प्रकरणात महिलांनि कश्या प्रकारे न्यायालयात लढा दिला पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले,डाँ मुंधडा यांनी महिलांना होणाऱ्या आजारावर कशी मात करता येतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रीती घोडेस्वार यांनी एखाद्याला काही अडचण असल्यास सखी वन स्टॉप मंच कडे संपर्क साधण्यास सांगितले
मान्यवरांच्या मार्गदर्शन नंतर महिलांचे विविध खेळ,स्पर्धा घेण्यात घेऊन महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका खनके, आभार तेजु पोडे, यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व बचतगटातील पदाधिकारी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाला 500 पेक्षा अधिक बचत गटातील महिलां सदस्यांची उपस्थिती होती.