Ashok Uike | पालकमंत्री अशोक उईके यांचा भव्य सत्कार

Ashok Uike

आदिवासी संघर्ष कृती समीती आणि भारतीय जनता पार्टीचे आयोजन

Ashok Uike : चंद्रपूरचे नवे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या प्रथम आगमनाच्या निमित्ताने आदिवासी संघर्ष कृती समीती आणि भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने प्रियर्दशीनी सांस्कृतिक सभागृह येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध सामाजिक संघटना, भारतीय जनता पार्टी आणि आदिवासी संघर्ष कृती समीतीच्या वतीने पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

            या सत्कार कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार करण देवतळे, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अतुल देशकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, दशरथ सिंग ठाकूर, तुषार सोम, अजय जयस्वाल, मनोज पाल, संजय कंचार्लावर, जितेश कुळमेथे, प्रमोद बोरिकर, कृष्णा मसराम, प्रा. हितेश मडावी, अॅड. संतोष कुडमेथे, सुधाकर कन्नाके, शांताराम उईके, ड्रेफुल आत्राम, विजय कुमरे, भय्याजी उईके आदींची उपस्थिती होती.

१९ वाघांची शिकार करणारा चंद्रपुरात

रात्रो ८.३० वाजता या कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी विविध संघटनांनी पालकमंत्री  डॉ. प्रा. उईके यांचा स्वागत व सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री यांनी चंद्रपूरच्या विकासाची ग्राव्ही दिली. आज माझ्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती लाभलेल्या जिल्हाचे पालकमंत्री पद मिळाले याचा आनंद असल्याचे” ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव वाडवून जिल्हाचे नाव लौकीक करण्यासाठी योग्य पावले उचलले जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजित प्रभावी अमलबजावणी आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

minister ashok uike

यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हाच्या विकासासाठी सहकार्य मिळावे अशी आशा व्यक्त केली. हे शहर दुरदृष्टी असणाऱ्या गोंड राजाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या पवित्र दिक्षाभूमीचे आहे. औद्योगिक असे हे शहर असून राज्याला रेव्हेन्यू देणाऱ्या या शहराचा सर्वसमावेशक विकास व्हावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री डॉ. प्रा. उईके यांच्याकडे केली. आपल्या नेतृत्वात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळेल असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविला.

यावेळी बोलतांना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी पालकमंत्री  डॉ. प्रा. अशोक उईके यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचा विकास होणार असा विश्वास व्यक्त केला. जितेश कुळमेथे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन प्रा. श्याम हेडाउ यांनी केले. कार्यक्रमाला आदिवासी टायगर सेना, बिरसा क्रांती दल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, क्रांतिवीर बाबुराव फुलेश्वर शेडमाके स्मारक समिती, एप्फ्रोड, गोंडियन आदिवासी कल्याण सहाय्यता संस्था, भारतीय जनता पार्टी यांच्या सदस्य व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!