House Breaking
House Breaking : चंद्रपुरातील गुन्हेगारी क्षेत्रात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढणे ही आता चिंतेची बाब ठरत आहे, नवीन वर्षात 3 जानेवारीला चंद्रपुरात 4 अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलाची अत्यन्त क्रूरपणे हत्या केली होती.
मात्र आता अल्पवयीन मुले घरफोडीच्या गुन्ह्यात सुद्धा सक्रिय झाले आहे, 17 जानेवारी रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने आमटे कॉलोनी, रयतवारी कॉलरी येथे राहणारा 24 वर्षीय मोहम्मद सरफरोज शागिर शाह याला अटक केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण
मोहम्मद सरफरोज ची चौकशी केली असता त्याने घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केली असल्याचा गुन्हा कबूल केला.
ह्या गुन्ह्यात 2 विधिसंघर्ष बालक सुद्धा सहभागी असल्याची बाब आरोपीने पोलिसांसमक्ष कबूल केली. आरोपी कडून सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण 3 लाख 67 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीला घुग्गुस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे. आरोपीचा अजून काही गुन्ह्यात सहभाग आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांकेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी चेतन गजलवार, जयंता चुनारकर, नितेश महात्मे, अमोल सावे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, अपर्णा मानकर, दीपिका सोडणार व दिनेश अराडे सहित सायबर पोलिसांनी केली.