Government Hospital
Government Hospital : जिल्हा सामान्य रूग्णालयाविषयी नागरिकांच्या तक्रारी, विविध सोयीसुविधांचा अभाव, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली हेळसांड व रूग्णालयाशी निगडीत विविध समस्यांची दखल घेत दि. १४ जानेवारी २०२५ रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी रूग्णालयास भेट देवून तेथील समस्यांबाबत डीन व सी एस. डॉ. महादेव चिंचोळे यांचेशी चर्चा करून समस्यांच्या निराकरणाविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
१६ जानेवारीला राज्यपाल चंद्रपुरात
जिल्हा रूग्णालयातील भेटीप्रसंगी येथील पेयजल, स्वच्छता व अन्य समस्यांबाबत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली. हंसराज अहीर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत काही कक्षांना भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करून शल्यचिकित्सकांना आवश्यक सुचना केल्या. यावेळी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस राहुल सुर्यवंशी, गौतम यादव, अमित क्षिरसागर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. hansraj ahir
जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा व प्रभावी रूग्णसेवा उपलब्ध करण्याची तसेच रूग्णालयातील सीटी स्कॅन व अन्य नादुरूस्त उपकरणे सुरू करून त्याचा लाभ गोरगरीब रूग्णांना उपलब्ध करण्याची सुचना केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत येथील समस्या निराकरणार्थ तातडीने कार्यवाहीची सुचना केली. जिल्हा रूग्णालयाशी निगडीत असलेल्या विविध समस्याविषयी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचे सुतोवाचही हंसराज अहीर यांनी यावेळी केले.