justice for shiva vazarkar
justice for shiva vazarkar : 24 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर शहरात युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला असला तरीही त्यांना शहरात राहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे असूनही आरोपी शहर मुक्तपणे संचार करीत असल्याचा आरोप वझरकर परिवाराने केला आहे त्यामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.
या संदर्भात वझरकर परीवाराने पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाकडे सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली आहे.
शिवा वझरकर यांच्या परिवाराचे न्यायासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु आरोपीं द्वारे वारंवार येत असलेल्या धमक्या आणि दबावामुळे कुटुंब नेहमी चिंतेत असल्याची माहीती दिली.
जामिनावर शहरात मुक्तपणे फिरणाया आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही. यावेळी आरोपीं व त्यांचे सहकारी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परीवाराने केला आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर कुटुंबाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लागू करण्याबाबत पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्रे पाठवली.
स्मार्ट प्रीपेड मीटर वरून आमदार वडेट्टीवार आक्रमक
या पत्राद्वारे पोलिस प्रशासनाकडे मोक्का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परंतु आजपर्यंत मोक्का अंतर्गत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले.
शिवा वझरकर हा वडिलांना वाईट बोलल्याने हिमांशू कुमरे ला जाब विचारण्यासाठी गेला होता, मात्र आरोपीने शिवा च्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले, यावेळी शिवा खाली कोसळला व त्याला आरोपीनी लाथा बुक्क्यानी मारहाण केली, यामध्ये शिवा चा जागीच मृत्यू झाला होता.
आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी शहरात आंदोलने झाली मात्र त्याचा प्रशासनावर फरक पडला नाही, आरोपी वर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले होते, विशेष बाब म्हणजे आरोपीपैकी एक हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.
शिवा वझरकर हत्याकांडात 25 वर्षीय हिमांशू कुमरे, 38 वर्षीय स्वप्नील काशीकर, 20 वर्षीय चैतन्य रासकर, 25 वर्षीय रिजवान पठाण, 21 वर्षीय नाझीर खान, 24 वर्षीय रोहित पितरकर, 27 वर्षीय सुमित दाते, 25 वर्षीय अन्सार खान यांना अटक झाली होती.
जामिनावर सुटलेले आरोपी त्यांना खटला मागे घेण्यासाठी वारंवार धमकावत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे शिवा वझरकर यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. कुटुंब मानसिक तणावाचा सामना करत आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे. आरोपींकडून साक्षीदारांवर दबाव वाढवला जात आहे. कायदेशीर न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने आरोपींवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे.