Justice for tanmay
Justice for tanmay : चंद्रपूर शहरात 3 जानेवारीला चार अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलाची दगडाने ठेचत क्रूर हत्या केली होती, अल्पवयीन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बाबूपेठ वासीयांनी 8 जानेवारी रोजी सायंकाळी केंडल मार्च काढला.
12 कोटीचा अपहार, चंद्रपुरात ईडी ने दिली धडक
डीएड कॉलेजच्या मैदानावरून निघालेला हा कँडल मार्च प्रभागातील भ्रमण करीत नेताजी चौकात पोहचला.
घटना काय?
3 जानेवारीला बाबूपेठ निवासी तन्मय जावेद खान हा 19 वर्षीय मुलगा सायंकाळी घरी येत होता वाटेत महाकाली मंदिर जवळ काही अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला तन्मय च्या वाहनाने कट लागली.
आमच्या वाहनाला कट का मारली म्हणून अल्पवयीन मुलांनी तन्मय सोबत वाद घालत त्याला मारहाण केली, त्यानंतर तन्मय ला दुचाकी वाहनाला झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली, तन्मय ने पैसे नसल्याचे सांगताच चार अल्पवयीन मुलांनी गौतमनगर भागात तन्मय ला नेत त्याची दगडाने ठेचत अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज बाबूपेठ भागातील नागरिकांनी तन्मय च्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कँडल मार्च (candal march) काढला.

नेताजी चौकात नागरिकांनी मनातील संताप व्यक्त केला, मारेकरी मुलांना आमच्या स्वाधीन करा आम्ही त्यांचा बंदोबस्त करु अशी मागणी यावेळी करण्यात आली, पोलिसांचे मूल असे गुन्हे करीत आहे म्हणून प्रशासन मारेकऱ्यांची पाठराखण करीत आहे.

मारेकरी अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा व्हायला हवी याबाबत तन्मय च्या आईने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत निवेदन दिले.