khashaba jadhav
khashaba jadhav : शासन निर्देशान्वये 15 जानेवारी हा दिवस ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. दिवगंत खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा हेलसिंकी 1952 मध्ये वैयक्तीक क्रीडा प्रकारातील कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले पदक (कास्य) पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे.
त्यांची आतंरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याला बहुमान तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन (State Sports Day) म्हणून साजरा करण्यात येत आहे. याकरीता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
चंद्रपूर शहरातील हा मुख्य मार्ग राहणार
ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव (khashaba jadhav) यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅली/ मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करावे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळा संदर्भात नियमावली, ऑलिम्पिक तसेच अन्य महत्वाच्या स्पर्धा व त्यामधील यशस्वी खेळाडू याबाबत प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे.
तसेच शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवादाचे आयोजन करावे. विविध खेळांचे सामने आयोजित करुन विजेत्यांना पुरस्कार वितरण करावे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, नवोदित खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, पालक, क्रीडाप्रेमी नागरीक यांच्यासमवेत क्रीडा तसेच करीअर संधीबाबत परीसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करावे. यशस्वी क्रीडा विषय, उपक्रम, क्रीडा अकादमींना भेटी देणे आदी उपक्रम राबविण्यात यावे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासनमान्य, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, क्रीडा संस्था, असोसिएशन, क्रीडामंडळे, क्रीडा अकादमी तसेच अनुदान मिळालेल्या सर्व संस्थांनी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करून राज्य क्रीडा दिनाचा अहवाल, फोटो, वृत्तपत्राच्या कात्रणासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.