chandrapur bribery case । ५० हजारांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक कारवाईच्या भीतीपोटी पळाला

chandrapur bribery case

chandrapur bribery case : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत लाकूड व्यापाऱ्याला ५ ० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जानेवारीला गुन्हा दाखल केला.मात्र कारवाई पूर्वीच पोलीस उपनिरीक्षकाने घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून ते कमिशन वर लाकूड बांबू व तेंदूपत्ता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचविण्याचे काम करतात.

चंद्रपुरातील ३ ४ नायलॉन मांजा विक्रेते तडीपार

ऑगस्ट महिन्यात तक्रारदार यांनी १९ लाख २ हजार रुपयांचा तेंदूपत्त्याचा माल गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोचता केला त्या मालाचे १९ लाख २ हजार हि रक्कम व्यापाऱ्याकडून येणे बाकी होते, मागील ३ ते ४ महिन्यापासून तक्रारदार यांना त्या मालाचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे मिळावे यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी तक्रारदाराला सदर रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी वीस टक्के रक्कम ३ लाख ८ ० हजार रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदार व व्यापारी या दोघांनी आपसात समन्वय साधत सेटलमेंट केले व गुंतवलेली मुद्दल १६ लाख १५ हजार रुपये व्यापाऱ्याने तक्रारदाराला परत केले. पैसे मिळाल्यावर त्या व्यापारी विरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये केलेला तक्रारअर्ज परत घ्यायचा आहे असे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांना सांगितले, दोघांची तडजोड झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शाह याना पैसे मिळणार नसल्याचे समजताच त्यांनी तक्रारदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने ८ जानेवारीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शहा यांनी तक्रारदार यांना तडजोड करीत ५० हजार रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी केली. त्यामुळे १३ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन पोलीस उपनिरीक्षक शहा यांच्याकडे गेले असता शहा यांना कारवाईचा संशय आल्याने ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, हिवराज नेवारे, अरुण हटवार, नरेशकुमार नन्नावरे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप तोडाम , राकेश जांभुळकर, मेघा मोहुर्ले , पुष्पा काचोळे, सतीश सिडाम, संदीप कौरासे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!
लसूणचे फायदे The most expensive laptop