Member of parliament | ग्रामीण भागातील जनतेशी माझी नाळ तुटणार नाही. – खासदार प्रतिभा धानोरकर

Member of parliament

Member of parliament : लोकसभेच्या अभुतपुर्व यशानंतर अनेक गावात माझ्या भेटी झाल्या नाहीत परंतु ग्रामीण भागातील जनतेशी माझी नाळ तुटणार नाही याचा मी प्रयत्न करणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये मी दौरा करुन तेथील समस्यांचा आढावा घेणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लापूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील दौऱ्या दरम्यान मत व्यक्त केले.

चंद्रपुरात आला कुख्यात गुन्हेगार, मार्केट मध्ये गेला आणि अडकला

स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. प्रचंड मोठे असलेल्या या लोकसभा क्षेत्राचा दौरा कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरु केला असून दि. 11 जानेवारी रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी, कवडजई, मानोरा, ईटोली, किन्ही, बामणी, विसापूर, नांदगाव पोडे या गावातील नागरीकांशी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या. (mp dhanorkar)

या दौऱ्या दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या प्रेमामूळे आज मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची मला संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची मी सदैव ऋणी राहणार आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून कॉग्रेस पक्षाच्या संघटन मजबूत करण्याच्या सुचना दिल्या.

mp dhanorkar

या दौऱ्या दरम्यान ईटोली येथे सामान्य कार्यकर्त्याच्या घरी पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद घेतल्याने गावकऱ्यांनी खासदाराप्रती आदर निर्माण झाला. तसेच दौऱ्या दरम्यान अनेक ठिकाणी खासदार धानोरकर यांनी शाळकरी मुलांशी, तसेच जेष्ठ नागरीकांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत बल्लारपूर नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, बल्लारपूर ग्रामीण चे तालुकाध्यक्ष गोविंदा उपरे यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!