mephedrone drug | दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी

mephedrone drug

mephedrone drug : चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने युवा वर्ग नशेच्या आहारी जात असून सोबतच गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव मोठं करीत आहे.


इंजेक्शन, सिगारेट द्वारे युवा वर्ग अंमली पदार्थांचे सेवन करीत आहे. बाबूपेठ, बगड खिडकी, बिनबा गेट असे शहरातील अनेक भाग आहे, ज्याठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होते.

तन्मय च्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या, बाबूपेठ वासीयांचा कँडल मार्च


चंद्रपूर पोलिसांनी नशेचा व्यापार नियंत्रणात यावा यासाठी मोहीम राबवित आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही युवक अंमली पदार्थांची विक्री करणार अशी गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली होती, माहितीच्या आधारे 7 जानेवारीला वृंदावन नगर येथे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी दोन युवक एमडी मफेड्रोन (mephedrone drug) पावडर सोबत घेऊन आले.


युवक येताच दुर्गापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, गणेश सदानंद देवगडे, शेख नदीम शेख रहीम यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ प्लॅस्टिक च्या पन्नी मध्ये एमडी मफेड्रोन पावडर 7.330 ग्राम किंमत 27 हजार 320 व दुचाकी वाहन किंमत 60 हजार असा एकूण 87 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी युवकांवर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये कलम 8 (क), 21(ब), 29 NDPS ऍक्ट 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


सदर अंमली पदार्थ आरोपी युवकांनी नागपुरातून आणले असल्याची कबुली दिली त्यानंतर दुर्गापूर पोलिसांनी नियोजनबद्ध कामगिरी करीत नागपुरातून एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणी आरोपीची संख्या आता 3 झाली आहे.

दुर्गापूर पोलिसांनी (durgapur police station) थेट नागपूर येथील आरोपीला अटक केल्याने अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे, दुर्गापूर पोलिसांनी हिम्मत दाखवीत कारवाई केली पण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा अंमली पदार्थांची विक्री होत आहे, आता त्यांनी सुद्धा हिंमत दाखवीत नशेचा व्यापार संपुष्टात आणावा.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोउपनी गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी योगेश शार्दूल, रुपेश सावे, संपत पुल्लीपाका, मंगेश शेंडे, प्रमोद डोंगरे, किशोर वलके, नरेश शेंडे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!