Most Wanted Criminal
Most Wanted Criminal : वर्ष २ ० २ ३ मध्ये पंजाब राज्यातील अमृतसर येथे पोलीस चौकीवर हॅन्ड ग्रेनेड टाकत हल्ला करणाऱ्या २ ० वर्षीय जसप्रीत सिंग या संशयित खलिस्तानी (khalistani) दहशतवाद्याला पंजाब राज्यातील गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिसांनी घुग्गुस मधून शुक्रवारी १ ० जानेवारीला अटक केली.
जसप्रीत सिंग सहा दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात दाखल झाला होता, जसप्रीतचा अंमली पदार्थ तस्करी व बाईक चोरी यासह विविध अवैध धंद्यात सहभाग होता, २ ० २ ३ ला अमृतसर येथील पोलीस चौकीवर हॅन्ड ग्रेनेड फेकत त्याने हल्ला केला तेव्हापासून जसप्रीत हा फरार होता. महाराष्ट्र राज्यात येण्यापूर्वी तो मेघालय मध्ये गेला होता, पंजाब राज्यातील गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होती.
वनविभागाने जखमी वाघाला केले जेरबंद
जसप्रीत च्या फोन लोकेशन वरून त्याची माहिती पोलीस घेत होते, यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे सहा दिवसांपूर्वी जसप्रीत आपल्या ओळखीच्या लोकांकडे आला होता, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने त्याचे फोटो जारी केले होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात आलेला व्यक्ती हा जसप्रीत सिंग आहे का याबाबत पोलिसांना शहानिशा होत नव्हती.
अश्यातच गुरुवारी जसप्रीत हा घुग्गुस येथील सुपर मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी आला त्यावेळी पंजाब मधील जसप्रीत सिग हा तोच आरोपी असल्याचे सिद्ध होताच गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत अटक करण्यात आली.