Movement of project victims | हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

Movement of project victims

Movement of project victims : वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलेरा व पिंपरी या गावाची पुनर्वसन प्रकीया मागील ३० वर्षांपासून सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दि. २५ जानेवारी २०२५ रोजीपासून खाणीमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलनाची गंभीर दखल घेवून पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (hansraj ahir) यांनी वेकोलिचे सीएमडी यांचेसोबत पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांबाबत दुरध्वनीवरून विस्तृत चर्चा केली व आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलकांच्या मागणीस पाठिंबा देत मुख्य महाप्रबंधक वणी नॉर्थ क्षेत्र यांचे उपस्थितीत पुनर्वसन व अन्य न्याय मागण्यांच्या पुर्ततेकरिता पुढाकार घेवून महिनाभरात विषय मार्गी लावण्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ यांचेकडून देण्यात आले.

उच्च विस्फोटक निर्मनी येथे पदभरती, आजच करा अर्ज

मुख्य महाप्रबंधक यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनानुसार महिनाभरामध्ये दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्त यादीचा विषय मार्गी लावून सन २०१९ पर्यंतची प्रकल्पग्रस्तांची नवीन यादी व २०११ ची जुनी यादी नुसार दोन्ही प्रस्ताव मुख्यालयाला सादर करून नवीन यादी धारकांकडून आवश्यक कागदोपत्री पुरावे मागवून कुंटूबाच्या अंतर्गत झालेले मालकीहक्क फेरफार ग्राह्य धरून पुनर्वसन लाभधारक यादीला अंतिम मान्यता द्यावी असे अहीर यांनी सांगितले. अहीर यांच्या मध्यस्थीने सुचविण्यात आलेल्या तोडग्याच्या आधारे प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी आपले खाणबंद आंदोलन मागे घेतले.

चंद्रपुरात नाना – नानी पार्कचे उदघाटन

आंदोलनामध्ये चर्चेदरम्यान यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदुरकर, बंडु चांदेकर, साधना उईके सरपंच कोलेरा पिंपरी, उपसरपंच केशव पिदुरकर, पवन एकरे, अतुल बोंडे, प्रियंका सातपुते, दिपक मत्ते, महेश देठे, बंडु खंडाळकर, बालु खामनकर, अनिल बोढाले, शंकर खामनकर व दोन्ही गावातील आंदोलनकर्ते प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!