Review meeting
Review meeting : खासदार प्रतिभा धानोरकर हया सध्या अॅक्शन मोड मध्ये आल्या असून लोकसभेतील दौऱ्या सोबतच त्यांनी शासनाच्या विविध विभागात आढावा बैठकीचे सत्र सुरु केले आहे.
काल दि. 13 जानेवारी रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संसदीय रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत विविध विभागासह आढावा घेऊन सबंधीत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यानंतर सीएसटीपीएस येथे हिराई विश्राम गृहामध्ये मुख्य अभियंता श्री. रोठड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनर्वसीत गावकऱ्यांच्या समस्या त्यासोबतच प्रकल्प बाधीत व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
बल्लारपुरातील पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 50 हजाराची लाच
सीएसटीपीएस मुळे आजुबाजूच्या गावाला होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा करुन तात्काळ समस्या दुर करण्याच्या सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्या. तसेच, दुर्गापूर वेकोली येथे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. दातार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंटक संघटनेच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेकोली मुळे होणाऱ्या परिसरातील नुकसानीवर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावर खासदार धानोरकर यांनी वेकोली मुळे होणाऱ्या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना वेकोलीतील संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांनी जाणीपुर्वक पक्षपात करु नये, सर्व संघटनांना समान न्याय द्यावा, अशा सुचना देखील वेकोलीतील अधिकाऱ्यांना दिल्या.
सदर बैठक वेकोली दुर्गापूर येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, काँग्रेस च्या महिला ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, इंटक चे के.के. सिंह, सोहेल रजा, प्रशांत भारती, यांसह अनेक पदाधिकारी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.