Nehru Market Shop | अडीच लाखांची थकबाकी, मनपाने ४ गाळ्यांना ठोकले टाळे

Nehru Market Shop

Nehru Market Shop :  2 लक्ष 47 हजार रुपयांची थकबाकी असणाऱ्या झोन क्रमांक १ मधील नेहरू मार्केट येथील ४ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊन, यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस दिल्यानंतरही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.


    नेहरू मार्केट येथे 2 गाळे असणाऱ्या पी कुमार आबाजी यांच्याकडे 82,274,जय गोपाल सुरेशचंद्र शहा यांच्याकडे 70,019 तर शामराव बालाजी नागपुरे यांच्याकडे एकुण 94,757 रुपयांची थकबाकी आहे.यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस या सर्वांना बजाविण्यात आली होती. मात्र करचुकवेगिरी करत असल्याने मनपा कर विभागाने गाळे सील केले आहेत.  

शिवा वझरकर हत्याकांडाला १ वर्ष पूर्ण, आरोपींवर मोक्का लावा, वझरकर कुटुंबाची पत्रकार परिषदेत मागणी


    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.

         
      सदर कारवाई 24 जानेवारी रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,कर विभाग प्रमुख अनिल घुले, प्रविण हजारे व इतर कर्मचारी यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!