new traffic rules
new traffic rules : चंद्रपूर शहरात रॅश ड्रायव्हिंग चे अनेक प्रकार समोर येत आहे, विशेष म्हणजे मुलगा/मुलगी वर्ग 10 किंवा 12 वी ची परीक्षा पास झाली की पालक आपल्या पाल्यांना दुचाकी वाहन खरेदी करून देतो.
आपली मुलं अल्पवयीन आहे, कायदा त्यांना वाहन देण्याची परवानगी देत नसताना सुद्धा पालक प्रेमापोटी त्यांना नियमांचं उल्लंघन करायला लावतात यातून अनेक अपघात सुद्धा झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 5 साखर कारखाने येणार
या बाबीवर नियंत्रण यावे म्हणून चंद्रपूर वाहतूक विभागाने 18 वर्षाखालील पालकांनी वाहन चालविण्यास दिले आणि ते वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले तर मोटर वाहन सुधारित अधिनियम 2019 कलम 1,99 A अनव्ये पालक/मोटर वाहन मालकास तीन महिन्यापर्यंत कैद/25 हजार रुपये दंड इतक्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. (Traffic rules for kids)
अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला कट लागल्याने केली हत्या
चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी या संदर्भात शहरातील महाविद्यालयाला नोटीस बजावत या कायद्याबाबत माहिती देत अल्पवयीन पाल्यांच्या पालकांना ही बाब कळविण्यात यावी अन्यथा या शिक्षेसाठी तयार रहावे अशी सूचना देण्यात आली आहे. (Traffic rules 2024)
शहरात असंख्य दुचाकी वाहन हे अल्पवयीन मुले चालवितात, वाहतूक पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे, कारण चंद्रपूर शहरात 3 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलांच्या वाहनाला धक्का लागल्याने एकाची हत्या करण्यात आली होती.
हत्या प्रकरणातील अल्पवयीन मारेकरी हे दुचाकी वाहन चालवीत होते, विशेष म्हणजे चार पैकी एक अल्पवयीन हा पोलिसांचा मुलगा आहे.
पोलिसांचे पाल्य जर कायदा मोडत असतील व ते कारवाई पासून वाचत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? कारवाई फक्त त्यांच्यावर का? वाहतूक पोलीस या प्रकरणाची सुध घेत त्यांच्या पाल्यांवर कारवाई करणार का? हे बघण्यासारखे राहणार आहे.