Nylon Manja Sellers
Nylon Manja Sellers : न तुटणारा जीवघेणा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल ३ ४ जणांना ३ दिवसांकरिता चंद्रपूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाची बंदी असताना सुद्धा जिल्ह्यात छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री सुरु होती.
मकरसंक्रांत आली कि नायलॉन मांजा विक्रेते सक्रिय होत प्रतिबंधित मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करतात, या मांजामुळे मानवी जीवितास व पक्ष्यांना धोका निर्माण होतो, असे असताना सुद्धा विक्रेते आपल्या फायद्यासाठी मांजा विक्री करीत कायद्याचे उल्लंघन करतात.
घुग्गुस च्या सुपरमार्केट मध्ये आला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार
पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना मकरसंक्रांत ला पर्यावरण पूरक धाग्याचा वापर करावा अशी अधिसूचना निर्गमित केली होती. याबाबत जनजागृती सुद्धा पोलीस विभागाने सुरु केली होती. या दरम्यान विविध ठिकाणी पोलिसांच्या पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धाडी टाकत कारवाई सुद्धा केली. deportes
१ ३ जानेवारीला अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी चंद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील १ ९ , रामनगर पोलीस स्टेशन ८ , घुग्गुस पोलीस स्टेशन २ , पोलीस स्टेशन दुर्गापूर ४ , पोलीस स्टेशन मूल १ अश्या एकूण ३ ४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना १ ३ जानेवारी ते १ ५ जानेवारी या ३ दिवसांच्या कालावधीसाठी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले असा आदेश निर्गमित केला.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर हद्दपारीची हि राज्यातील पहिलीच कारवाई आहे, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, प्रभावती एकुरके, असिफरजा शेख, श्याम सोनटक्के, लता वाढीवे, सुमित परतेकी यांनी केली.