Padoli Chowk
Padoli Chowk : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जिल्हîात अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी स्वतः याबाबत पडोली चौकात अपघात कमी करण्याकरीता ओव्हर ब्रिज चे मागणी करणारे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना लिहले आहे.
बांबू कामगारावर वाघाचा हल्ला, मृतदेहाजवळ वाघाचा ठिय्या
राज्य महामार्गाच्या अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर शहरातील पडोली चौकात अनेक अपघाताच्या मालिका घडल्या असून अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अपघात कमी करण्याकरीता उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या होत्या.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः या बाबतीत लक्ष देऊन पडोली चौकातील अपघात रोखण्याकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून सदर चौकात ओव्हर ब्रिज ची मागणी केली आहे. सदर पुल निर्माण झाल्यास अपघाताची श्रृंखला मोडकडीस निघेल असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय गडकरी यांना लिहीलेल्या पत्रातून व्यक्त केला आहे. सदर मागणी बाबात केंद्रीय मंत्री काय निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
- जिल्हा सामान्य रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव, हंसराज अहिर यांनी दिले हे निर्देश
- आर्थिक दृष्ट्या असक्षम कलाकारांसाठी शाहरुख-सलमान आले एकत्र