Pratibha Dhanorkar News
pratibha dhanorkar news : सन 2018 पासून अनेक शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केला असुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज जोडणी मिळत नसल्याची खंत मा. मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देंवेद्र फडणविस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे खा. धानोरकर यांनी व्यक्त केली.
चंद्रपुर जिल्हात 1596 शेतकऱ्यांनी शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंप वीज जोडणी मिळावे याकरिता अर्ज केला असुन त्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेले नाही. शासन कृषी पंपाना सौर उर्जा लावण्यासाठी शेतकऱ्यांना जबरदस्ती करित आहे. ते योग्य नसल्याची बाब खा. धानोरकर यांनी व्यक्त केली.
एमईआरसी च्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना सौर उर्जे करिता शासन जबरदस्ती करु शकत नाही. त्यामुळे अनामत रक्कम भरलेल्या शेतकाऱ्यांना तात्काळ कृषी पंप वीज जोडणी देण्याची मागणी खा. धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणविस (cm devendra fadnavis) यांना पत्राद्वारे केली आहे.
सदर मागणी तात्काळ पुर्ण करावी अशी विनंती देखिल खा. धानोरकर यांनी केली आहे. सदर मागणी पुर्ण न झाल्यास शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर उग्र आंदोलन करण्याचा ईशारा खा. धानोरकर यांनी दिला आहे.