President’s Medal
President’s Medal : चंद्रपूर: नागपूर येथील एसीबी पोलीस उप अधीक्षक पदावर कार्यरत असलेले रोशन यादव यांच्या प्रदीर्घ उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेच्या नोंदी पाहून सन-2025 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी चंद्रपूर येथे विविध पदावर जबाबदारी पार पाडली आहे.
मानवी वन्यजीव संघर्षाचा जिल्ह्यात दुसरा बळी
सरळ सेवेत 1995 पीएसआय म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त गोंदिया आणि गडचिरोली येथे सेवा दिली आहे. त्यांनी मांगेझरी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत महत्त्वाचे नक्षल साहित्य आणि उपकरणे जप्त केले. तसेच नक्षल शोध मोहिमेत सीमेवरील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा मृतदेह जप्त केला.
एसीबी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सामील झाल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विशेषतः अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात अनेक उल्लेखनीय कामगिरी. नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर येथे त्याच्या पोस्टिंगदरम्यान एटीएम चोरी ,डकैती करणारे आंतरराज्यीय टोळ्यांचा शोध घेवून तसेच इतर गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्यांना आरोपींना अटक करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली आहे.
त्यांनी हैदराबादमध्ये ग्रे हाउंड कमांडोचे सर्वात कठीण प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
ते एक चांगले फुटबॉलपटू असून त्यांनी जिल्हा आणि रेंज स्पोर्ट्समध्ये भाग घेतला आहे.