Dangerous nylon manja
Dangerous nylon manja चंद्रपूर : किराणा दुकानात सायकलने जाणाऱ्या तिसऱ्या वर्गातील नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाने कापला. ही घटना वृंदावननगर परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. गळा कापलेल्या अवस्थेतच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुदैवाने त्याचा जीव वाचला. 9 वर्षीय साई जंपलवार असे मांजाने जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
साई जंपलवार हा वृंदावननगर येथील रहिवासी असून, लोकमान्य टिळक ज्ञान मंदिरामध्ये तिसऱ्या वर्गात शिकतो. रविवारी सकाळच्या सुमारास तो सायकलने दुकानात जाण्यासाठी निघाला. काही अंतरावरच अचानक नायलॉन मांजा (Chinese manja) त्याच्या मानेला चिरून गेला. अचानक गळा कापल्याने त्याला काही सुचेनासे झाले. परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन कायमस्वरुपी बंदी घालावी. नायलाॅन मांजा विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, नायलाॅन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
चंद्रपुरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने केली हत्या
नायलॉन मांजाने पतंग उडवू नका
नायलॉन मांजामुळे मुलाचा गळा कापला गेला. पण, डॉक्टरांमुळे त्याला जीवदान मिळाले. पतंग उडविणाऱ्यांनाे नायलॉन मांजाने पतंग उडवू नका. साध्या दोराने उडवा, पतंग विकत घेता येतो, पण गेलेला जीव परत येत नाही.
विद्यार्थ्याची काही चूक नसतानाही नाहक त्याचा गळा चिरला. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. यावरून मांजा किती घातक आहे, हे कळते. नायलाॅन मांजा विकणाऱ्यांवर, या मांजाची पगंत उजविणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांसह आपल्यावरही अशीच वेळ येऊ शकते.