Recent Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात बांबू कामगार ठार, मृतदेहाजवळ वाघाचा ठिय्या

Recent Tiger Attack

Recent Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहावर ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले.

१४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कंत्राटदार यांना वाटप करण्यात आलेल्या बांबू युनिट क्रमांक ५ राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये कामगार ५७ वर्षीय लालसिंग बरेलाल मडावी राहणार जिल्हा मंडला राज्य मध्यप्रदेश हा बांबू निष्कासनाचे काम करीत होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंग वर हल्ला करीत त्याला ठार केले.

१६ जानेवारीला चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स व क्लायमेट चेंज, राज्यपाल राहणार उपस्थित

घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र हल्लेखोर वाघ हा लालसिंग यांच्या मृतदेहाजवळ बसून होता. वन कर्मचाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ उलट वन कर्मचाऱ्यांवर धावण्याचा प्रयत्न करीत होता. वाघ मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता, बराच वेळ निघून गेल्याने वनविभागाने अतिशीघ्र दलाला पाचारण केले.

अतिशीघ्र दलाचे शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले,पशुवैधकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी वाघाची तपासणी करीत त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सदर वाघ हा नर असून तो ४  वर्षाचा आहे, वाघाला पुढील तपासणी साठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले. मृत लालसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता रुग्णालयात नेण्यात आला.

मानव वन्यजीव संघर्षातील वर्षातील हि दुसरी घटना आहे, मागील वर्षी मानव वन्यजीव संघर्षात एकूण २९ नागरिकांचा बळी गेला होता ज्यामध्ये २७ वाघाने, २ बिबट व १ रान डुक्कराच्या हल्ल्यात बळी गेला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!