Retired teacher protest | सेवानिवृत्त शिक्षकांच्या धरणे आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

Retired teacher protest

सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रशासनविरुद्ध एल्गार

Retired teacher protest : विविध मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आयोजित धरणे आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी भेट देत शिक्षकांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना सदर मागण्यांसंदर्भात आठवडाभरात बैठक लावण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

सन २०१२, २०१४, २०१८ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर कडून मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा, शिल्लक राहिलेल्या सेवानिवृत्त शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सातवे वेतन आयोगाचे २, ३, ४ व ५ हप्ते देण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे डि.ए. अरिअर्सची रक्कम देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण अधिकारी यांचे उपदान, अंशराशीकरण ची रक्कम देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा प्रलंबित गटविमा त्वरीत देण्यात यावा, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढी देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या काल्पनिक वेतनवाढी त्वरित मंजूर करून निकाली काढण्यात याव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त दिनांकाला गट विमा रक्कमेचा चेक देण्यात यावा.  

चंद्रपुरात अलिखित सट्टा ला परवानगी

             

   या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट दिली असून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना आंदोलनस्थळी बोलावून घेत सदर मागण्या सोडविण्यासाठी आठवडाभरात बैठक घेण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. या आंदोलनात शेकडो निवृत्त शिक्षक सहभागी झाले होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!