attack on government employee । वाळू तस्करांचा तलाठीवर हल्ला, आरोपी फरार

attack on government employee

attack on government employee : मागील २ वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झालेले नाही, मात्र यावर वाळू तस्कर घाटाच्या लिलावाची वाट न बघता नदीला पोखरण्यासाठी सज्ज झाले आहे, मागील २ वर्षांपासून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज वाळू तस्करीच्या व्यवसायात उतरलेले आहे. दिवसा राजकारण व रात्री वाळू चोरी अशी दिनचर्या काही नेत्यांची झाली आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील काही सोबत आर्थिक हितकारण करीत हि महसूल चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू १ फेब्रुवारीला चंद्रपुरात

३० जानेवारीला भद्रावती येथील कारेगाव येथे वाळू तस्करी (Sand mafia) थांबविण्यासाठी गेलेल्या तलाठीला जीवघेणा अनुभव आला. (Talathi attack) कारेगाव मध्ये ट्रॅक्टर चालक शंभू भरडे हे गावात वाळू खाली करीत होते तलाठी अनंत गीते यांनी ते दृश्य बघताच रेती बाबत परवाना आहे का विचारले मात्र चालकाकडे परवाना नव्हता. तलाठी गीते यांनी मंडळ अधिकारी व पोलिसांना याबाबत संपर्क केला. मात्र त्यावेळी तिथे उपस्थित तस्कर समर्थकांनी तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली. 

पोलीस तक्रार झाली मात्र आरोपी फरार

पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालक शंभू भरडे, राजेश्वर गायकवाड, गंटिकवार व त्यांचे बंधू यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १३२, २९६, ३०३ (२), ३ (५), ४८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महसूल खात्यातील महत्वाचा घटक म्हणून तलाठी आपले काम बजावीत आहे मात्र त्याच्यावर वाळू तस्करांचा हल्ला हि गंभीर बाब असताना सुद्धा जिल्हा महसूल प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे दाखवीत आहे. (Accused absconding)

जिल्ह्यात मूल, पोंभुर्णा व सावली हे ठिकाण वाळूचे मोठे हब आहे मागील २ वर्षांपासून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे मात्र प्रशासन या महसूल चोरीवर मुकदर्शकाची भूमिका घेऊन गप्प बसले आहे. या २ वर्षात हायवा ट्र्क वर अत्यन्त दुर्लभ कारवाया करण्यात आल्या आहे हे विशेष. या घटनेवरून पोलीस व जिल्हा प्रशासनाला जाग येणार काय? हि तर येणारी वेळच सांगणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!