Satta Matka
Satta Matka : चंद्रपुरात गुन्हेगारी सत्र जोरात सुरू आहे, एमडी ड्रग्स, गांजा, कोंबडा बाजार, व आता सट्टा यासाठी अलिखित परवानगी दिल्या जात आहे. आधी एकमुस्त रक्कम जमा करा आणि काम सुरू करा अशी यंत्रणा आपलं काम वेगवान करीत आहे. तसही सरकारी यंत्रणा कासवगतीने आपलं काम करते पण ह्या अलिखित परवान्यासाठी ही यंत्रणा सश्याच्या रुपात काम करीत आहे.
काही दिवसांपासून प्रियदर्शिनी चौकात दिवसाढवळ्या सट्टा सुरू होता, कारण सट्टा धारकाला कुणाचीही भीती नव्हती त्यासाठी त्याला परवानगी मिळाली होती ती पण अलिखित.
आता शहरातील दुर्गापुरात अनेक काळापासून धीरज ठेवलेले काही इसम आपल्या धंद्यासाठी परवानगीची वाट बघत होते, मात्र यासाठी त्याला चांगल्या सहकाऱ्यांची गरज होती, मग काय या धंद्यातील पर्वतावर वास्तव्य करणाऱ्या कैलास ची त्याला साथ मिळाली.
19 वाघांची शिकार करणारा अजित वनविभागाच्या ताब्यात
आणि दोघेही अलिखित परवानगी घेऊन आले व थाटात एखाद्या महाराजांसारखे आपलं बिऱ्हाड मांडत काम सुरू केलं, विशेष बाब म्हणजे दुर्गापुरातील महाराज, जाकीर आणि कैलास यांनी काही वर्षांपूर्वी मोठ्या थाटात सट्टा मटका सुरू केला, मात्र काही कारणास्तव त्यांचं काम बंद पडलं.
आता कैलास आणि धीरज ने या धंद्यासाठी आपली आघाडी निर्माण केली आहे, ताडोबा रोड दुर्गापूर मधील वार्ड क्रमांक 3 येथे भव्य सट्टा बाजार सुरू करण्यात आला आहे, रोज दुपारी सायंकाळी याठिकाणी सट्टा शौकीन आपला गेम लावतात.
सध्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारणाचा उपक्रम राबवित आहे, जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे, मात्र अलिखित परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या प्रवृत्तीचे निराकरण पोलीस अधीक्षक करणार काय? ही तर येणारी वेळ सांगेल.
सध्यातरी दुर्गापुरातील सट्टा बाजार अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहे, जिल्ह्यात असे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, नुकताच गडचांदूर येथील कोंबडा बाजार चर्चेत आला होता, यासाठी परवानगी देण्याचं काम पथकातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत केल्या गेलं होतं.
दुर्गापूर भागात यापूर्वी कैलास व जाकीर ने मोठ्या प्रमाणात टेंट टाकत आपला सट्टा सुरू केला होता, तो व्यवसाय काही दिवस सुरु राहिला, आता पुन्हा कैलास ने नव्या वर्षात धडाक्यात एन्ट्री मारली आहे. या धंद्यावर पोलीस दलातील सिंघम अधिकारी कधीतरी कारवाई करण्याची हिंमत दाखविणार काय?