Side effects of eating rice
Side effects of eating rice : तुम्हाला सुद्धा भाताशिवाय रातचं जेवण अपूर्ण वाटतं का? जर होय, तर तुम्हाला रात्री भात खाण्याचे काही साइड इफेक्ट्स माहिती असणे गरजेचे आहे.
भारतात बहुतेक लोकांना डाळ-भात खायला खूप आवडतं. काही लोक तर भाताशिवाय जेवण पूर्ण करतच नाहीत. दुपारच्या वेळी भात (rice) खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्य तज्ज्ञ नेहमी रात्री भात खाणं टाळण्याचा सल्ला देतात?
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच महिन्यात 3 वाघाचा मृत्यू
तुम्हाला सांगायचं झालं तर रात्रीच्या जेवणात भात खाण्याची सवय तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. रात्री जे लोक भात खातात, त्यांची पचनसंस्था (गट हेल्थ) खराब होऊ शकते.
रात्री भात खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही रात्रीच्या आहारातून भात वगळला पाहिजे.
रात्री भात खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा ही अनेक गंभीर आणि धोकादायक आजारांना आमंत्रण देणारी समस्या आहे. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर रात्री भात खाणं टाळा.
ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांची श्वास घ्यायला अडचण होते, त्यांनी रात्री भात खाणं टाळावं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री भात खाल्ल्यामुळे घशाला खवखव होऊ शकते. शिवाय ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांनी देखील रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळावं.
डायबेटीसच्या रुग्णांनी सुद्धा रात्री भात खाणं टाळलं पाहिजे, अन्यथा त्यांचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे तुमच्या आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.