Social responsibility MLA । चंद्रपूरच्या आमदाराचं दमदार काम

Social responsibility MLA

Social responsibility MLA : संकटाच्या काळात तत्परतेने मदत करणारे लोकप्रतिनिधी समाजासाठी प्रेरणादायक ठरतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असुन श्याम नगर येथील 70 वर्षीय महिलेच्या उपचारासाठी आमदार किशोर जोरगेवार पूढे आले आहे. त्यांनी या महिलेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी उपलब्ध करुन दिला असुन उर्वरित खर्च स्वखर्चाने केला आहे. गुडघ्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असुन ती आता स्वस्थ आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २० दिवसात ४ वाघांचा मृत्यू


श्याम नगर येथील निर्मला गोजे या सत्तरी गाठलेल्या महिलेला गुडघ्याचा आजार झाला. त्यामुळे तिला चालणे फिरणे वेदनादाई झाले होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने पूढील उपचार करण्यासाठी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली होती. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर महिलेच्या उपचारा करिता मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 50 हजार रुपये उपलब्ध करुन दिले. त्यानंर सदर वृध्द महिलेवर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन क्नी रिपलेस्टमेंट करण्यात आले आहे.


शस्त्रक्रियेनंतर आमदार जोरगेवार यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन वृद्ध महिलेची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांकडून तिच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली आणि पुढील उपचारांसाठीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी वृद्धेच्या कुटुंबीयांनी आमदार जोरगेवार यांचे आभार मानले समाजातील ज्येष्ठ नागरिक हे आपल्या संस्कृतीचे अधिष्ठान आहेत. त्यांची काळजी घेणे आणि त्यांना योग्य उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. ही मदत करण्याची संधी मिळाल्यामुळे मला समाधान वाटत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!