Online Booking Scam | चंद्रपुरात असं काय घडलं की “ईडी’ ने धाड मारली

online booking scam

online booking scam : ताडोबा ऑनलाइन बुकिंग च्या नावाखाली झालेला गैरव्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आला असून 8 जानेवारीला सक्त वसुली संचालयाने कोट्यवधी रुपयांची अफरातफर करणाऱ्या ठाकूर बंधूंच्या प्रतिष्ठानावर धाडी मारल्या.

वर्ष 2020 ते 2023 या कालावधीत ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ऑनलाइन बुकिंग च्या नावाखाली चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला तब्बल 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांचा चुना लावला होता.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातर्फे wildcon 2025 चे आयोजन

शासकीय पैश्यांची या कंपनीने उधळपट्टी केल्याचे समजताच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

या घोटाळ्यामुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली होती, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे (tadoba andhari tiger reserved) संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी सक्त वसुली संचालयाकडे दाद मागितली, आज 8 जानेवारीला पहाटे 4 वाजता सक्त वसुली संचालयाचे 25 अधिकारी चंद्रपुरात दाखल झाले व त्यांनी कंपनी संचालकांच्या निवासस्थानी व त्यांच्या प्रतिष्ठानावर धाड मारली. ईडी च्या धाडीने पुन्हा ताडोबा तिकीट ऑनलाइन बुकिंग घोटाळा पुन्हा चर्चेत आला. 

चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीचे संचालक रोहित ठाकूर व अभिषेक ठाकूर हे दोघे सख्खे बंधू बाहेरगावी असल्याची माहिती आहे. Online booking scam

दोन्ही ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट मध्ये आर्थिक गैर व्यवहार केला होता, सदर प्रकरणी दोन्ही बंधूनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. 12 कोटी ची रक्कम तात्काळ जमा करावी असे आदेश न्यायालयाने ठाकूर बंधूंना दिले होते, यामधील काही रक्कम ठाकूर बंधूनी जमा केली अशी माहिती आहे.

असा झाला घोळ

चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या नावाच्या कंपनीसोबत ताडोबा-अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक यांनी करार केला. या करारानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना सफारीसाठी ऑनलाईन नोंदणी यांच्याकडून करावी लागत होती. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन सख्या भावंडांची आहे. या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकत होती. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती. मात्र या कंपनीने केवळ १० कोटी ६५ लाख जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!